शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

महिनाभरात ३४ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 7:48 PM

नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील पेठ तालुका पर्जन्यमानात सर्वात पिछाडीवर आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील पेठ तालुका पर्जन्यमानात सर्वात पिछाडीवर आहे. पेठ तालुक्यात आतापावेतो अवघा १४.३९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.नाशिक जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान १५,००४.६९ मि.मी. इतके आहे. त्यात पावसाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या आणि सर्वाधिक धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक ३०५७.९८ सरासरी पर्जन्यमान असते. तर सर्वात कमी पर्जन्यमान देवळा तालुक्यात ४२२.०७ मि.मी. नोंदविले जाते.---------------------१ यावर्षी हवामान खात्याने सरासरी इतक्या पावसाचा अंदाज यापूर्वीच वर्तविलेला आहे. त्यानुसार महाराष्टÑात मान्सूनचे वेळेत आगमन होऊन जिल्ह्यातही सर्वत्र पावसाने आतापर्यंत समाधान कारक हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यात १ जून ते ९ जुलै २०२० या कालावधीत सरासरी ३३९.८३ मि.मी. म्हणजेच ३३.९७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.२ मागील वर्षी याच कालावधीत सरासरी ३०५.५१ मि.मी. पाऊस कोसळला होता. यंदा त्यात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९०.९५ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. सरासरीच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या बागलाण तालुक्यात मागील वर्षी याच कालावधीत कमी पर्जन्यमान नोंदले गेले होते. त्यावेळी अवघा १०३ मि.मी. पाऊस झाला होता.३ यंदा मात्र ४८८.२० मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी असलेल्या बागलाण तालुक्यात आतापर्यंत ४४४ मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. निफाड आणि अवर्षणग्रस्त मालेगाव तालुक्यातही यंदा ७५ टक्क्यांवर पाऊस झालेला आहे. खरीपाच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. मागील वर्षी पेठ तालुक्यात जून-जुलै कालावधीत ८५५ मि.मी. पाऊस कोसळलेला होता.

टॅग्स :Nashikनाशिक