गणेश शेवरेपिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू व प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी (दि.२९) पिंपळगाव परिसरातील अंबिका नगर येथे गायीवर यशस्वी शस्त्रक्रि या करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने ३५ किलो प्लास्टिक काढले. सोबत मांजा, दोन नाणी, वायसर, हेडफोनच्या पिना, तारेचे तुकडे असे साहित्य निघाले. सुदैवाने या गंभीर शस्त्रक्रि येतून गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.यावेळी डॉ. चौधरी यांच्यासोबत सहायक निलेश गायके व कुणाला धनवटे होते. शस्त्रक्रि येनंतर गायीची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. या वेळी देशी गाय रानात चरावयास नेत असताना बारकाईने लक्ष ठेवावे.प्लॅस्टिक वेस्टेज सोबतच जर प्रत्येक नवीन उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलास जर घन कचरा व्यवस्थापनाचे तसेच घन कचरा विल्हेवाटीचे सोपे उपाय उपलब्ध केल्याशिवाय परवानगी, बांधकाम पुर्तता प्रमाणपत्र सरकारने देउच नये. नवी दिल्ली मुन्सिपल प्रशासनाने काही वर्षापूर्वी हा उपक्र म राबविला होता. पुढे तो उपक्रम गुंडाळला गेला आणि समस्या तशीच राहिली. प्लास्टिक बंदी करण्यापेक्षा प्लास्टिक डिस्पोजल सिस्टम विकसित करून लोकापर्यंत पोहोचवावी. म्हणजे बेवारस जनावरे आणि पर्यावरण दोघेही सुरक्षित राहतील. अशा प्रतिक्र ीया डॉक्टरांनी दिल्या.उकीरड्यावर चरणारी गाई-गुरे माणसाने टाकलेल्या प्लास्टिकचे बळी ठरत आहेत व त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- डॉ. अल्केश चौधरी, पशुधन विकास अधिकारी.दिवसेंदिवस प्लास्टिकचा अति वापर होत आहे. त्यामुळे मोकाट व मुक्या जनावरांचा जीव धोक्यात येत आहे. मानवी जीवन स्वार्थी होत चालले आहे त्याच्या टाकाऊ वस्तू कुठेपण टाकून देत असल्यामुळे परिणामी मुके जनावरे यात बळी ठरत आहे.- जयवंत विधाते, पशुपालन शेतकरी.
गाईच्या पोटातून काढले ३५ किलो प्लॅस्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 3:23 PM
पिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू व प्लास्टिक असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी (दि.२९) पिंपळगाव परिसरातील अंबिका नगर येथे गायीवर यशस्वी शस्त्रक्रि या करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने ३५ किलो प्लास्टिक काढले. सोबत मांजा, दोन नाणी, वायसर, हेडफोनच्या पिना, तारेचे तुकडे असे साहित्य निघाले. सुदैवाने या गंभीर शस्त्रक्रि येतून गायीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : पशुधन विकास अधिकारी यांची यशस्वी शस्त्रक्रि या