आरोेग्यच्या ७६ बदल्या; विनंती बदल्यांमध्ये कर्मचार्यांची नाराजीनाशिक : जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांच्या धामधुमीत रविवार व सोमवार मिळून १११ कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. त्यात रविवारी आरोग्य कर्मचार्यांच्या ७६, तर बांधकाम, पशुसंवर्धन व लघु पाटबंधारे विभागाच्या ३५ बदल्यांचा समावेश आहे.रविवारी आरोग्य विभागातील आरोग्यसेविका व औषधनिर्माता या संवर्गातील कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या. त्यात ६४ आरोग्यसेविकांच्या प्रशासकीय, तर चार आरोग्यसेविकांच्या विनंती बदल्या झाल्या. त्याचप्रमाणे औषधनिर्माता या संवर्गातील आठ प्रशासकीय बदल्या झाल्या. आरोेग्यसेविकांच्या विनंती बदल्यांमध्ये काही महिला कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली. मालेगावहून कळवणची मागणी केलेली असताना प्रत्यक्षात पेठ तालुक्यात बदली करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लघु पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता संवर्गातील सहा प्रशासकीय व दोन विनंती अशा एकूण आठ बदल्या झाल्या. त्याचप्रमाणे बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील एक विनंती बदली करण्यात आली, तर प्रशासकीय बदल्यांमध्ये पाचही कर्मचार्यांनी नकार दिलेला असताना एका कर्मचार्याची समतोल राखण्यासाठी बदली करण्यात आली. कनिष्ठ अभियंता संवर्गातील पेसा (आदिवासी) क्षेत्राबाहेर तीन प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या, तर बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात आठ बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. पशुसंवर्धन विभागातील जागा रिक्त नसल्याने सहायक पशुधन विकास अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत, तर पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील पेसातून बाहेर तीन प्रशासकीय, तर आदिवासी भागात नऊ प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे पेसा क्षेत्रात दोन विनंती बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. बदल्यांची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कार्यकारी अभियंता विष्णू पालवे, अनिल अहिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो..ऑनलाइन बदल्यांचे आदेश कागदावरचमागील तीन वर्षांपासून कर्मचार्यांच्या बदल्यांची कार्यवाही करताना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बदल्यांची कार्यवाही झाल्याबरोबर लगेचच कर्मचार्याच्या हाती नियुक्ती झालेल्या ठिकाणचा बदली आदेश समुपदेशनाच्या वेळी दिला होता. यावर्षी मात्र अर्थ, सामान्य प्रशासन, कृषी, आरोग्य, बांधकाम, लपा, पशुसंवर्धन अशा अनेक विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या झाल्या; मात्र यातील बहुतेक कर्मचार्यांना बदल्यांचे आदेशच प्राप्त झालेले नाहीत. ऐनवेळी त्यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांमध्ये नाराजी आहे.
बांधकाम, पाटबंधारे आणि पशुसंवर्धन कर्मचार्यांच्या ३५ बदल्या
By admin | Published: May 19, 2014 11:51 PM