मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. शहर पोलीस उपविभागातील ९ व कॅम्प पोलीस उपविभागातील ६ अशा पंधरा जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. तर दोघा विभागातील साडेतीनशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच नाकाबंदी, कोंबिंग आॅपरेशन राबवून गुन्हेगारांवर वचक ठेवला जात आहे. लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला आहे.शहर पोलीस उपविभागातील ९ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करुन जिल्हा पोलीस प्रमुख व प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत तर ११० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. यापूर्वी शहर उपविभागातून २५ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित ११ प्रस्तावांवर सुनावणी सुरू आहे.
३५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 5:45 PM