नाशिक: शिधापत्रिकाधारकांना आपल्या पसंतीनुसार रेशनधान्य दुकान निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजपर्यंत या सुविधेचा लाभ ३५ हजार कार्डधारकांना घेतला आहे. घराजवळ दुकान असावे तसेच रेशनदुकानदाराबाबत असलेली तक्रार अशा दोन कारणांमुळे दुकाने बदलून घेतलेल्या कार्डधारकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.
रेशनदुकानदारांच्या माध्यमातून कार्डधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळी तसेच साखरदेखील कार्डाच्या गटावरून रेशन दिले जाते. पिवळे, पांढरे आणि केशर कार्डधारकांना देय असलेल्या रेशनचा पुरवठा दुकानदारांच्या माध्यमातून केला जातो. परंतु कार्डधारकाला रेशनदुकानदाराबाबत तसेच वितरण प्रणालीतील अडचणीमुळे काही तक्रार असेल तर त्यांना आपले दुकान बदलण्याची सुविधा पोर्टेबिलटीच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे.
अनेकदा दुकानदारांविषयी कार्डधारकांच्या तक्रारी असतात. एकतर दुकानाची वेळ आणि धान्याच्या दर्जाबाबत तसेच धान्य संपल्याच्या तक्रारीमुळे कार्डधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दुकानदार दुकान उघडत नसल्याने ग्राहकांना परतावे लागते. अनेकदा तारीख उलटून गेली तरी रेशनचे धान्य मिळत नाही. अनेकदा दुकानदाराच्या वर्तणुकीचीदेखील तक्रार असते. अशावेळी ग्राहकांना पार्टबिलिटी सुविधेचा लाभ होता. नाशिक जिल्ह्यात जून अखेरपर्यंत सुमारे ३५ हजार ग्राहकांनी अनेकविध कारणांनी आपली दुकाने बदलून घेतली आहेत.
--इन्फेा--
शहरात अधिक बदल
नाशिक जिल्ह्यातील रेशनकार्ड पोर्टेबिलिटी योजनेची आकडेवारी पाहिली तर नाशिक महापालिका तसेच नाशिक तालुक्यातील रेशनकार्डधारकांनी जास्ती जास्त या योजनेचा लाभ घेतला आहे. नाशिक धान्य पुरवठा विभागांतर्गत ९,५९२, तर नाशिक तालुक्यातील ६,९९५ इतक्या कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शहरामध्ये ग्राहकांमध्ये असलेल्या जनजागृतीमुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोक्ष असल्याचे दिसते.
--इन्फो--
मेाफत धान्य मात्र तक्रारीही वाढल्या
गरीक कुटुंब कल्याण योजनेंतर्गत कार्डधारकांना येत्या नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे. मात्र मोफत धान्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची प्रमुख तक्रार असते. अनेकदा दोन महिन्यांचे एकदम धान्य दिले जाते मात्र धान्याचा दर्जा निकृष्ट असतो अशा तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. अशा दुकानदारांविषयी तक्रारीदेखील होत असल्याने अशा दुकानदारांची सरप्राइज चेकिंगदेखील केली जाते.
--इन्फो--
३५,२१४
रेशनकार्डधारकांनी बदलला दुकानदार
१२२८३२९
जिल्ह्यातील एकूण कार्डधारक
५८५३५१
बीपीएल
१७२३४६
अंत्योदय
४७०६२९
केशरी