सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचारी वर्ग अन् आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव वनविभागाला सतावत असल्याचे चित्र आहे.गोदावरी नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर ऊस आणि बागायती क्षेत्र आहे. जवळच नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. शिवाय नाशिक महापालिका आणि सिन्नर नगरपरिषद आपल्या कार्यक्षेत्रातील मोकाट कुत्रे पकडून गोदाकाठ भागात आणून सोडतात.शेतकºयांमध्ये घबराट, पिंजरे बसविण्याची मागणीकुत्र्यांचे भक्ष्य मिळते आणि जर मिळालेच नाही तर माणसे, लहान मुले, जनावरे यांच्यावर हल्ले करून पोट भरण्यासाठी बिबट्या या परिसरात येतो. महाजनपूर शिवारात एका महिन्याच्या कालावधीत एकाच ठिकाणी पाच, तर शिंगवे येथे जवळपास अर्धा तास रस्त्यावर विश्रांती घेऊन बिबट्याने शेतकºयावर हल्ला करण्याचा प्रयत्न ताजा असतानाच करंजगाव येथे बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाºयांना यश मिळालेवनविभागाने या भागात बिबट्यांचे प्रमाण जास्त असल्याने पिंजºयांची आणि कर्मचारीसंख्या वाढवावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून मजबूत पिंजरे वापरावे, अशी मागणी होत आहे.
सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 6:20 PM
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचारी वर्ग अन् आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव वनविभागाला सतावत असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देगोदाकाठ परिसर : दोन मुलांसह दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्लेअपुरा कर्मचारी वर्ग, आधुनिक यंत्रसामग्रीची उणीव