लासलगाव : येथून जवळच असलेल्या पाचोरे येथे सुरगाणा तालुक्यातील द्राक्षबागेच्या मशागतीकरीता आलेल्या ३७ शेतमजुरांना गुरुवारी दुपारी जेवणानंतर उलट्या सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान या सर्वांनी खाल्लेल्या भाकरी व भाजीचे नमुने डॉक्टरांनी ताब्यात घेतले आहेत.या सर्वांना गणेश किसन उगलमुगले, अशोकराव माधव उगलमुगले व संदीप लक्ष्मण जगताप यांनी धावपळ करीत लासलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. या मजुरांवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, डॉ. आहिरे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचार केले. या सर्वांची प्रकृती आता सुधारत आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सूर्यवंशी व डॉ. आहिरे यांनी पाचोरे येथे घटनास्थळी भेट देऊन या मजुरांनी आणलेली बाजरी व भाजी याचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले.ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे याप्रमाणे : योगीता उत्तमराव गारे (रा खडकीसाले), तुलसा जयवंत पारे (रा.गांडूकमाळ), यशवंत विठ्ठल वाघमारे (रा. उंबरपाडा), पूनम शिवराम गायकवाड (रा. उलगुत), राही काळू गवळी (रा. शेपणपाडा), नवसू मंगळ पवार, सोनी काशीनाथ ब्राह्मणे (रा. कवेली), हेमलता धीराजी चव्हाण (रा. श्रीरामपूर), रघुनाथ बाबूराव वाघमारे, फुलकर सखाराम गारे, हेमराज गुलाबराव वाघमारे, बाळू किसन बोसारे, लीला देवीदास गवळी, जयराम रामदास गवळी, चिंतामण गोविंद गवळी, सीताराम बाळू वाघमारे, दत्तूू नाथीराम जाधव, दत्तूू काशीनाथ जाधव, हेमंत लक्ष्मण गायकवाड, गणेश देवराम ब्राह्मणे, लीला किसन बोसरे, शिवाजी लक्ष्मण गवळी, नवसू पवार, चिंतामण गोविंद गवळी, भाग्यश्री देवराम ब्राह्मणे, योगेश मनोहर वाघमारे, प्रवीण हरी वाघमारे, देवीदास तुळशीराम कडले, राहुल काशीनाथ चौधरी, यशवंत गणपत जाधव, विकी काशीनाथ चौधरी, भाऊ नारायण शेवरे, सोमनाथ चिंतामण ब्राह्मणे, जनार्दन परशुराम वाघमारे, रत्नाबाई चिमण पवार, गोविंदा नथुराम चौथवे, चिमण लहानू पवार, काळू गवळी, गोविंद शिवराम उटाडे, जयवंत वाकत पारे.
३७ शेतमजुरांना जेवणातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 1:45 AM
येथून जवळच असलेल्या पाचोरे येथे सुरगाणा तालुक्यातील द्राक्षबागेच्या मशागतीकरीता आलेल्या ३७ शेतमजुरांना गुरुवारी दुपारी जेवणानंतर उलट्या सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान या सर्वांनी खाल्लेल्या भाकरी व भाजीचे नमुने डॉक्टरांनी ताब्यात घेतले आहेत.
ठळक मुद्देपाचोरे येथील घटना : वेळीच उपचार झाल्याने प्रकृती स्थिर