मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या स्वाइन फ्लू कक्षात आजाराची लक्षणे आढळून आलेल्या ३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. दहा रुग्णांचे स्वॅप नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले.आतापर्यंत शहरात एकही स्वाइन फ्लूने बाधित रुग्ण आला नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर डांगे यांनी दिली. जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे येथील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यासाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे. या कक्षात गेल्या २० दिवसांत एक हजार २९१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ३८ स्वाइन फ्लूसदृश रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले. सध्या दररोज दोन ते तीन रुग्ण दाखल होत आहेत. लक्षणे आढळून आलेल्या ९३ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. संशयित १० रुग्णांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
३८ स्वाइन फ्लूसदृश रुग्णांवर मालेगावी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:56 PM
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या स्वाइन फ्लू कक्षात आजाराची लक्षणे आढळून आलेल्या ३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. दहा रुग्णांचे स्वॅप नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले.
ठळक मुद्देसंशयित १० रुग्णांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले