नाशिक : दारणा नदीच्या काठालगत असलेल्या सामनगाव, एकलहरे परिसरात बिबट्याचा संचार अद्यापही कायम आहे. या भागात एक दोन नव्हे तर तब्बल २० पिंजऱ्यांची तटबंदी करण्यात आली आहे. बिबट्या रात्रीच्यावेळी भटकंती करतो अन् पिंजºयांभोवती फेरफटकाही मारतो; मात्र पिंज-यात येत नसल्याने वनविभागापुढे सध्या प्रतीक्षा व प्रयोगांमध्ये अदलाबदल करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लढविल्या जाणा-या क्लृप्त्याही पावसाच्या रिपरिपीमुळे अयशस्वी ठरू लागल्या आहेत.दारणाकाठालगत बिबट्याच्या हल्ल्यात चार बळी गेले आहेत. यामध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. तसेच चौघा चिमुकल्यांचे प्राण सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यात बचावला आहे. दारणाकाठालगतच्या विविध गावांमध्ये ऊसशेतीलगत सुमारे ३८ ट्रॅप कॅमेरे व २० पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील बिबट्या अद्याप जेरबंद होऊ शकलेला नाही.दारणा खोºयालगत बाभळेश्वर, हिंगणवेढे, दोनवाडे या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत. तसेच चेहडी, पळसे, सामनगाव, कोटमगाव या गावांत दैव बलवत्तर राहिल्यामुळे मुलांचे प्राण वाचले. या गावांमध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन अन् हल्ले झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. दरम्यान, दारणा खो-यालगत गावांमध्ये संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे.
३८ ट्रॅप कॅमेरे अन् २० पिंजरे मात्र रिपरिपीमुळे प्रयोगांवर पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:31 PM
संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,
ठळक मुद्देबिबट्याचा संचार कायमपावसामुळे अडचणींत वाढ गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी