----
अझहर शेख,
नाशिक : कोरोनाचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते. सुमारे चार महिन्यांच्या या कालावधीत शासनाच्या विविध निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांसह गुन्ह्यांचे गांभीर्य बघून ‘एफआयआर’ही नोंदविण्यात आले. शहरात या काळात एकूण ३९ हजार १४२ गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
लॉकडाऊन काळात मास्क सक्ती, परवानगीनुसार प्रवास, दुकानांची निश्चित वेळ मर्यादा, सामाजिक अंतर राखणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे पालन, नाइट कर्फ्यू, असे अनेकविध बंधने नाशिककरांवर लादण्यात आली होती. या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ नुसार विविध पोलीस ठाण्यांत अदखलपात्र गुन्ह्यांसह एफआयआरही नोंदविण्यात आले. दरम्यान, शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण १ हजार १७६ एफआयआर, तर ३७ हजार ९६६ दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांची तीव्रता अधिक नसल्याने लॉकडाऊनमध्ये नागरिक केवळ स्वत:च्या गरजेपोटी घराबाहेर पडत होते आणि अनवधानाने बहुतांश लोकांकडून निर्बंधांचे उल्लंघन होत होते. यामुळे राज्यभरात या काळात दाखल झालेले कलम-१८८ अन्वये गुन्हे मागे घेण्याचा विचार राज्याच्या गृहखात्याकडून सुरू आहे. यामुळे पोलीस कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या ससेमिऱ्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत.
---इन्फो--
‘लॉकडाऊन’मध्ये नाशिककरांना ७ कोटींचा दंड
लॉकडाऊन काळात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सर्वाधिक कारवाई करण्यात आली. २५ मार्च ते २३ डिसेंबर २०२० या कालावधीत एकूण ६ कोटी ९९ लाख ५५ हजार ७५० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत ९८ लाख ६० हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यास वाहतूक शाखेला यश आले आहे. उर्वरित संबंधित वाहनचालकांना दंडाची रक्कम भरण्याकरिता नोटिसा बजावल्या जात आहेत.
----इन्फो--
‘लॉकडाऊन’मध्ये नऊ पोलिसांवर हल्ले
शहरात लॉकडाऊन काळात नऊ कोरोनायोद्धा पोलिसांवर संशयितांकडून हल्ले करण्यात आले. यामध्ये ४ पोलीस जखमी झाले होते. याप्रकरणी एकूण १६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. सर्वाधिक गंगापूर पोलीस ठाण्यात ३, तर अंबड, म्हसरूळमध्ये प्रत्येकी २ आणि उपनगर, नाशिक रोडमध्ये प्रत्येकी १, असे नऊ गुन्हे दाखल आहेत.
----
आलेख
--
लॉकडाऊनमध्ये दाखल गुन्हे- ३९,१४२
मास्कविना वावरणे- १९,९७८
संचारबंदीचे उल्लंघन- १७,९९४
वाहतूक नियमांचे उल्लंघन-
सोशलमीडियावर अफवा- ९
---
डमी जेपीजी फॉरमेट आर वर ०४ क्राइम विड्रॉल नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
040221\04nsk_9_04022021_13.jpg
===Caption===
गुन्हे होणार रद्द