पाटोदा : येवला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस वेग आला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती ग्रामसभेद्वारे काढण्यात आल्या आहेत. गावागावांतील राजकीय पक्षाच्या गटप्रमुखांनी वरचष्मा राखण्यासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा चुरशीच्या लढती पहावयास मिळणार आहे.सरपंचपदाची निवड पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून होणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रभागातील लढतींमध्ये चुरस पहावयास मिळणार आहे. गावपातळीवर आपल्याच गटाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गावपुढाऱ्यांनी बेरीज-वजाबाकीचे राजकारण सुरू केले आहे. त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू झाली आहे.
या ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका
उंदीरवाडी, निमगावमढ, नांदूर, गणेशपूर, पिंपळगाव जलाल, कोळम बुद्रुक, अंगणगाव, धुळगाव, आडगाव रेपाळ, कानडी, सत्यगाव, नगरसूल, विसापूर पिंपरी, साताळी, बाभूळगाव खुर्द, जळगाव नेऊर, आंबेगाव, वाघाळे, मुखेड, अनकाई, पाटोदा, देशमाने बुद्रुक, अंदरसूल, कोटमगाव खुर्द, राजापूर नेऊरगाव, पुरणगाव, सातारे, एरंडगाव बुद्रुक, मुरमी, पिंपळगाव लेप, महालखेडा, पाटोदा, साोमठाणदेश, ठाणगाव, देवठाण, धामणगाव, कातरणी, विखारणी, सायगाव, खैरगव्हाण, गुजरखेडे, भाटगाव, सावरगाव आदी.येवला महसूल विभागाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करण्यात येत असून या 44 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला राखीव व नागरिकांचा मागास प्रवर्ग निहाय सोडती करण्यात आल्या आहेत.बाशिंगवीरांचा हिरमोडथेट जनतेतून सरपंचाची निवड राज्य सरकाने रद्द केल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची घोर निराशा झाली आहे. तसेच प्रभाग आरक्षणात महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित केल्याने पुरु ष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. अनेकांनी सौभाग्यवातीला निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (दि.७) प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्र मानुसार दावे व हरकती स्वीकारून अंतिम सुनावणी होऊन अंतिम यादी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.- रोहिदास वारु ळे, तहसीलदार