सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याकडून १४२ क्विंटल द्राक्ष खरेदी करुन परप्रांतीय व्यापार्याने ४ लाख ४ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.सोनांबे येथील योगेश चंद्रभान पवार यांच्या फिर्यादीवरुन व्यापारी अजयसिंग शिवभजन याच्याविरोधात सिन्नर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, योगेश पवार यांच्या सोनांबे येथील गट नं. ६२२ व ६२३ मध्ये द्राक्षबागेची लागवड केली असून दि. ५ ते १० फेब्रुवारी २०२० या कालावधीत व्यापारी अजयसिंग शिवभजन याने पवार यांच्या शेतात येऊन ३२०० रुपये प्रतिक्विंटल दराने १४२ क्विंटल द्राक्ष ४ लाख ५४ हजार ४०० रुपयांना खरेदी केले. सदर रक्कमेपैकी ५० हजार रुपये अजयसिंग शिवभजन याने पवार यांना रोख देत उर्वरित ४ लाख ४ हजार रुपये नंतर पाठवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पवार यांनी अजयसिंग शिवभजन याने दिलेल्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही रक्कम न मिळाल्याने पवार यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणुक झाल्याची फिर्याद दिली. पवार यांच्या फिर्यादीवरुन सिन्नर पोलिसांनी अजयसिंग शिवभजन याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करत आहेत.
सोनांबे येथील द्राक्षबागायतदार शेतकऱ्याला ४ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 9:50 PM
सिन्नर: तालुक्यातील सोनांबे येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याकडून १४२ क्विंटल द्राक्ष खरेदी करुन परप्रांतीय व्यापार्याने ४ लाख ४ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देसिन्नर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.