ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे बुधवारी कोरोनाचे चार रु ग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने कंटेन्मेंट झोन परिसरात व संपूर्ण गावात आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात येत आहे.बुधवारी चार रु ग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्यामार्फत सर्व्हे सुरू आहे. प्रत्येक घरी जाऊन घरातील व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. कोरोना या आजाराबाबत घाबरू नका, पण काळजी घ्या याबाबतची पत्रके घरोघरी वाटप करीत आहे. आजार लपवू नका कोरोनाबाबत काही लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी लगेच संपर्कसाधण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.ठाणगाव येथे रु ग्ण निघाल्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी ठाणगावला भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन बैठकीत त्यांनी १४ दिवस गाव पूर्णपणे बंद ठेवण्यास सांगितले. जर कोणी आपले दुकान उघडले तर त्यास दोन हजार रु पये दंड करावा, गावात जर कोणी बिगर मास्कचे फिरत असतील तर त्यांना शंभर रु पये दंड करावा, असे सांगितले. बाधित असणाऱ्या रु ग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरण्टाइन करण्यात आले असून, लवकरच त्या सर्वांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.कंटेन्मेंट झोन असणाºया भागात ४४ कुटुंब राहत असून, ३३४ एवढी लोकसंख्या या भागात आहे. पाच टीमद्वारे संपूर्ण गावात सर्व्हे करण्यात येत आहे.