लासलगाव बाजार समितीच्या आवारात मंगळवारी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा़.
लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून मंगळवारी (दि.२४) लासलगाव बाजार समिती आवारात एकाच दिवशी २०५० वाहनातून सुमारे बावीस हजार क्विंटल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. हा आजवरचा विक्रम मानला जातो. मोठ्या प्रमाणावर कांदा आवक झाल्याने अनेक वाहनांतील कांद्याचा लिलाव होऊ शकला नाही.नाशिक जिल्ह्यात इतर कांदा बाजारपेठेपेक्षा सर्वाधिक बाजारभाव लासलगाव येथे मिळत असतो. मंगळवारी दिवसभरात सर्वोच्च विक्र मी १९३३ वाहनांतील २० हजार ७०० क्विंटल कांदा लिलाव किमान २००० ते कमाल ८१०० तर सरासरी ६५०१ रुपये दराने झाला. अजून १२५ वाहनांतील कांदा लिलाव होणे बाकी असून तो बुधवारी (दि.२५) सकाळी लवकर पार पडेल, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी यावेळी दिली.दरम्यान, विंचूर येथील उपआवारावर ४३२ वाहनातील तर निफाड येथील उपआवारावर १०६ वाहनातील कांदा लिलाव झाला. लासलगाव येथील मुख्य आवार व उपआवारावर एकत्रित २७५० वाहनातून कांदा विक्र ीस आला होता. लाल कांदा शेतात चांगला पोषक झाला आहे. त्यामुळे वाहनांची संख्या अधिक वाढणार आहे. दोन वर्षांपूर्वी एकाच दिवशी २२५० वाहनांतील लिलाव एकाच दिवशी लासलगाव बाजारपेठेत झाला होता.