नाशिक : दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून दिव्यांग मतदारांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वरच्या मजल्यावरील मतदान केंद्रे ही यापूर्वीच खालच्या मजल्यावर आणण्यात आलेली आहेत. दिव्यांगांना मतदान केंद्रात येताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी केंद्रातील प्रवेशद्वारावर रॅम्पची व्यवस्था, एक मदतनीस याबरोबरच अंधांसाठी ब्रेल मतपत्रिकादेखील देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.जिल्हा प्रशासनाकडून सुरुवातीला राबविण्यात आलेल्या मोहिमेत प्रारंभी दहा हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अपंगांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांची मदत घेऊन आणखी दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. नव्या आकडेवारीनुसार आता दिव्यांग मतदारांची संख्या १२,३०४ झालेली आहे.दिव्यांगांची विशेष सुविधाया मतदारांचे सर्व मॅपिंग झालेले असून, कोणते मतदार कोणत्या भागात आहेत याची माहिती मतदानाच्या दिवशी सेक्टर आॅफिर्ससला महत्त्वाची ठरणार आहे. एकाचवेळी अनेक दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी विशेष गाडीची व्यवस्था केलीआहे.
दिव्यांग मतदारांसाठी ४५० व्हीलचेअर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 2:12 AM
दिव्यांग मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी दिव्यांगांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी सुमारे ४५० व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देउपाययोजना । गाडीत घेऊन जाण्याचीही व्यवस्था