ओझरटाऊनशिप : ओझर नगर परिषद हद्दीत ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक बँगचा वापर करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेता, दुकानदार यांचे कडून ओझर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ४० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या.ओझर शहरात १ जुलै २०२१ पासून प्लास्टिक बंदी करण्यात आलेली असून ओझर नगरपरिषद मार्फत प्लास्टिक बंदी जनजागृती करून देखील अनेक भाजीपाला फळे विक्रेते, दुकानदार ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापर करत असल्याचे निदर्शनास आल्यावर ओझर नगरपरिषदेचे प्लॅस्टिक बंदी पथकातील कर्मचारी सोमनाथ महाले, निलेश शेळके, जयंत गाडेकर, किशोर त्रिभुवन, महेंद्र जाधव, विजय शेजवळ यांच्या पथकाद्वारे कार्यवाही करून ओझर शहरातील ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणारे अनेक भाजीपाला फळे विक्रेते व दुकानदार यांच्याडून ४० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहे.ओझर शहरात प्लास्टिक बंदी असून पुढील काळात भाजी फळे विक्रेते व दुकानदार यांच्याकडे ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक किंवा स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलीन बॅग्ज वापर करु नये असे आवाहन करुन सदर प्लॅस्टिक वस्तूचा वापर करताना आढळल्यास महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम, घनकचरा व प्लास्टिक बंदी अधिनियम २०१६, ओझर नगरपरिषद उपविधी व प्लास्टिक बंदी अधिसूचना २०१८ अन्वये कलमानुसार कार्यवाही केली जाईलअसा इशारा मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिला आहे.
ओझर नगरपरिषदेकडून ४० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 6:57 PM
ओझरटाऊनशिप : ओझर नगर परिषद हद्दीत ५० मायक्राँनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक बँगचा वापर करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेता, दुकानदार यांचे कडून ओझर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ४० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या.
ठळक मुद्देओझर नगरपरिषद मार्फत प्लास्टिक बंदी जनजागृती