शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला ४० हजार नागरिकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 1:40 AM

कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला तब्बल ४० हजार नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे आगामी १५ ते २० दिवसांत सुमारे दोन हजार घरांचे बुकिंग होऊन बांधकाम उद्योग क्षेत्रात सुमारे ६०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा क्रेडाईचे सभासद बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्फोच्या समारोपप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी रविवारी (दि.१७) व्यक्त केली.

ठळक मुद्देसमारोप : बांधकाम क्षेत्रात ६०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा

नाशिक : कोरोना संकटामुळे दोन वर्षांनंतर क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला तब्बल ४० हजार नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे आगामी १५ ते २० दिवसांत सुमारे दोन हजार घरांचे बुकिंग होऊन बांधकाम उद्योग क्षेत्रात सुमारे ६०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा क्रेडाईचे सभासद बांधकाम व्यावसायिकांनी क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्फोच्या समारोपप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन यांनी रविवारी (दि.१७) व्यक्त केली.

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ ला भेट देणाऱ्यांमध्ये नाशिकसह जळगाव, धुळे, अहमदनगर, ठाणे, मुंबई व पुणे येथील नागरिकांचा समावेश होता. यातील सुमारे ३८० नागरिकांनी नाशिक शहरातील विविध बांधकाम प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन घरांची बुकिंग केले, तर हजारो ग्राहकांनी प्रकल्पांना भेट देऊन वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये घरांची, दुकानांची पाहणी केली. राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार (घटना समिती) जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, किरण चव्हाण, नेमीचंद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष कृणाल पाटील व मानद सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, श्रेणिक सुराणा, सागर शहा, सुशील बागड, अनंत ठाकरे, सचिन बागड, अतुल शिंदे, सचिन चव्हाण तसेच सर्व सदस्यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

इन्फेा...

कनेक्टिविटीमुळे संधींची कवाडे उघडली - गोडसे

डोंगरे वसतिगृह मैदानावरील चार दिवसीय क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचा रविवारी (दि. १७) खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी त्यांनी प्रॉपर्टी एक्स्पोच्या आयोजनासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोविषयी गौरवोद्गार काढतानाच शहराच्या वाढलेल्या कनेक्टिविटीमुळे संधींची अनेक कवाडे नाशिकसाठी उघडल्याचे नमूद केले. तसेच येणाऱ्या काळात नाशिक विमान सेवेद्वारे अनेक महत्त्वाच्या शहरांशी जोडले जाणार असून नाशिक-पुणे रेल्वे सेवेचेही काम प्रगतीपथावर आहे. कनेक्टिविटी वाढल्यास अनेक संधी नाशिकला मिळतील, ज्याने सर्व शहराला त्याचा लाभ होणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय