नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकद्वारे ओळख झालेल्या परदेशी डॉक्टर महिलेने इंदिरानगरमधील विद्युत व्यावसायिकास नॅस्ट्रोजेन सीड््स बियांचा व्यापार करण्याचे आमिष दाखवून तब्बल ४१ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या महिलेने ही रक्कम स्वत:च्या तसेच वेळोवेळी वेगवेगळे बँक खाते क्रमांक देऊन त्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते़ या प्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात विदेशी महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील सुयश टेरेस अपार्टमेंटमधील रहिवासी प्रमोद पांडूरंग मोरे (४७) यांचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय असून, त्यांनी इंडिया मार्ट या साइटवर नोंदणी केली आहे़ युनायटेड किंग्जडम येथील संशयित डॉ़ ख्रिस्ती जुन्स या महिलेने जून २०१७ ते आतापर्यंत +४४७५३४९९३८५४ व ४४७५५४९६३२८९ या क्रमांकावरून मोरे यांना फोन केला व केंट फार्मास्युटिकल्स (यूक़े.)कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नॅस्ट्रोजेन सीड्स या बियांची मागणी केली़
फेसबुकच्या ओळखीतील व्यापारातून ४१ लाखांची फसवणूक नॅस्ट्रोजेन सीड्स : विदेशी डॉक्टर महिला; व्यावसायिकास गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:27 AM