कळवण : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने ‘मागेल त्याला वीज’ या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांना जागेवर वीज मागणी अर्ज अन् कोटेशन भरून तत्काळ वीजजोडणी व मीटर या उपक्र माचे कळवण शहर व तालुक्यातील विविध गणेश मंडळांनी स्वागत केले व या उपक्र मांतर्गत शहरातील ४१ गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असून, कळवण पर्टनचे हे तिसरे वर्ष आहे.कळवण शहरातील विविध गणेश मंडळांना वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एम. एस. बागुल, आर. पी. गवळी, बहिरम, एन. के. चव्हाण, जी. डी. साबळे, एन. बी.सावकार, जगदीश पगार, पी. टी. गायकवाड यांनी मंगळवारी, बुधवारी व गुरु वारी भेटी देऊन या नावीन्यपूर्ण उपक्र माची माहिती देऊन वीजजोडणी करण्याचे आवाहन केले होते. ४१ गणेश मंडळानी वीजजोडणी करून घेण्यासाठी मागणी केली व त्या अन्वये ८० हजार रु पये अनामत रक्कम भरु न घेण्यात आली, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी दिली.
४१ मंडळांचा जागेवर अर्ज अन् तत्काळ वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 6:34 PM