-------------------
लॉकडाऊन न करण्याची मागणी
सिन्नर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी निर्बंध कडक करावे, परंतु लॉकडाऊन करू नये, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे करण्यात आली आहे. -------------------------
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
सिन्नर : तालुक्यातील मिठसागरे येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना जनजागृती करण्यात आली. यावेळी गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
------------------
सिन्नर वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात
सिन्नर : सिन्नर सार्वजनिक वाचनालयात तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भगत यांच्या हस्ते संत तुकारामाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
-------------------------
पाताळेश्वर विद्यालयात योगासनांचे धडे
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक यांना योगासनाचे धडे देण्यात आले. कोरोना काळात संकटाचा सामना करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून सदरचा उपक्रम विद्यालयात राबविण्यात येत आहेत.