नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २० हजार ८७७ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १६ हजार ६२३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २१६२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.४८ आहे. त्यात नाशिक शहरात ९६.८१, नाशिक ग्रामीण ९६.२५, मालेगाव शहरात ९३.३४, तर जिल्हाबाह्य ९४.७० असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ३३ हजार ७४७ असून, त्यातील चार लाख ११ हजार ७४६रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २० हजार ८७७ रुग्ण बाधित आढळून आले असून, ११२४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
इन्फो
तब्बल तीन महिन्यांनी बाधित चारशेपार
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून साधारणपणे दोनशे ते तीनशेपर्यंत कोरोनाबाधित आकडा रहात होता. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी,महिन्यात बाधितसंख्या शंभर ते दोनशेदरम्यान कायम होती. तर फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बाधित संख्येने पुन्हा अडीचशे-तीनशेचा टप्पा ओलांडण्यास प्रारंभ केला. तर बुधवारी हा बाधित आकडा तीन महिन्यांनी थेट ४२४ वर पोहोचल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या वेगाने भर पडत असल्याचे अधोरेखित झाले आहे.