शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

महापालिकेच्या ४३ सेवा आता मोबाइल अ‍ॅपवर मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:12 AM

विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्या मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरील धावपळ टाळण्यासाठी महापालिकेने आता विविध प्रकारच्या तब्बल ४३ सेवा आॅनलाइन केल्या असून, या सेवेचा शुभारंभदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ आता टळणार असून, घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीनिशी दाखले मिळणार आहेत.

ठळक मुद्देस्मार्ट कारभार : घरबसल्या मिळणार दाखले अन् परवानग्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार दाखले

नाशिक : विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्या मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरील धावपळ टाळण्यासाठी महापालिकेने आता विविध प्रकारच्या तब्बल ४३ सेवा आॅनलाइन केल्या असून, या सेवेचा शुभारंभदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ आता टळणार असून, घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीनिशी दाखले मिळणार आहेत. इतकेच नव्हे तर घरगुती अशाप्रकारच्या परवानग्या मिळतातानाच त्या मोबाईल अ‍ॅपवर तर मिळतीलच शिवाय भविष्यात व्हॉटस अ‍ॅपवरदेखील देण्याचे नियोजन आहे.महापालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालये आणि उपकेंद्र अशा २२ ठिकाणी नागरी सेवा केंद्रे असून, अशा विविध ठिकाणी नागरिकांना होणारी पायपीट थांबणार आहे. राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरणानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन आयटी विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार आता सर्व सेवांसाठी असलेल्या नियम अटी आणि कागदपत्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले असून, परिणामकारक सेवा देण्यात येणार आहे.नव्या पद्धतीने वेगाने कामकाज करण्यासाठी तीन टप्पे व तीन कागदपत्रे कमी झाली असून, वेबसाइटबरोबरच मोबाइल अ‍ॅपवर दाखले आणि परवानग्या मिळणार आहेत.महापालिकेने त्यासाठी परिश्रमपूर्वक बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग अंतर्गत सर्व विभागातील अंशत: वेगवेगळी असणारी प्रक्रिया एकसारखी केली असून आता कोणत्याही परवानगीसाठी ठराविकच कागदपत्रांची मागणी होईल. यामुळे नागरीकांचा त्रास वाचणार आहे. एकूणच प्रक्रियेमध्ये सुलभता आणल्याने परवानगी अथवा दाखले देण्याची प्रक्रिया वेगाने होणारआहे.व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार दाखलेमहापालिकेने भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपवरही दाखले देण्याची तयारी केली आहे. अर्जदाराच्या मोबाइल नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप असल्यास दाखल्याची प्रत किंवा परवानगी पत्र मेलवर तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक