नाशिक : शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.१३) दिवसभरात नवे ३७ रूग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात एकूण ५१ रुग्ण नव्याने मिळून आले. यामध्ये मालेगावमधील ४ नाशिक ग्रामीणमध्ये १३ नवे रूग्ण मिळून आले. जुने नाशिकमधील एका माजी नगरसेवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला. शहरात कोरोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता २९ झाली आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-यास श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शहर पोलीस दलातसुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही दिवसांपुर्वी भद्रकाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त झाला होता, त्याचा उपचारादरम्यान दोन दिवसांपुर्वीच पुन्हा कोरोना नमुना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.
नाशिक शहरात करोनाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या १ हजार ८६८ वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात ३७ रु ग्ण करोनामुक्त झाल्याने करोनावर मात क रणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात १ हजार २२९ वर पोहचली आहे.आज दिवसभरात जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये केवळ नाशिक शहरातील ४४ रु ग्ण आढळून आले आहेत. यात फुलेनगर-३, पेठरोड-३ , खडकाळी-४, कथडा-२, कालिकानगर-३, पखालरोड-२, जुने नाशिक-२ गंजमाळ, चौक मंडई, अमृतधाम, साईधामरोड, मायको सर्कल, सारडा सर्कल, त्र्यंबकदरवाजा, रविवार कारंजा, नवरंग कार्यालय, हनुमानवाडी, रोहिणीनगर, येथील प्रत्येकी१ या प्रमाणे कोरोनाचे नवे रु ग्ण आढळून आले आहेत. प्रामुख्याने जुने नाशिकचा मोठा परिसर करोना संसर्गाने व्यापला आहे. तर रविवार कारंजा, मेनरोड अशा मुख्य बाजार पेठेतील रु ग्ण आढळल्याने या भागातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.ग्रामिण भागात आज १३ रूग्ण आढळून आले आहेत. यात येवला येथील ६, सिन्नर दोडी १, लखमापुर १, ओढा १, भगुर १ येथील असून यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा ३१९ झाला आहे. तर जिल्ह्यात आज तिघांचा मृत्यू झाला असल्याने एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा ११८ वर पोहचला आहे. तसेच जिल्ह्यात आज ३७ रु ग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.