शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

नाशिक शहरात ४४ तर ग्रामिण भागात ६१ कोरोनाग्रस्त रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 8:53 PM

सायंकाळी पुन्हा पाच नवे रुग्ण शहरात आढळून आले तर ग्रामिण भागात चांदवड तालुक्यातील देवरगाव, मालेगाव तालुक्यातील सोयगावमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. शहराचा आकडा तर थेट ४४ वर पोहचला आहे.

ठळक मुद्देशहरात सायंकाळी पुन्हा पाच नवे रुग्ण आढळून आले

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरूवारी (दि.७) जिल्ह्यात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२१ इतका होता; मात्र शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता हा आकडा थेट ५५७ पर्यंत जाऊन पोहचला तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा आकडा थेट ५७२ इतका झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत प्रलंबित ६०० नमुन्यांपैकी ४२० अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३८० निगेटिव्ह तर एकूण ३८ पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले. सायंकाळी पुन्हा पाच नवे रुग्ण शहरात आढळून आले तर ग्रामिण भागात चांदवड तालुक्यातील देवरगाव, मालेगाव तालुक्यातील सोयगावमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. शहराचा आकडा तर थेट ४४ वर पोहचला आहे.मालेगावमध्ये कालपर्यंत ४२० रुग्ण होते; मात्र सकाळी ही संख्या ४४१ वर पोहचली आणि सायंकाळी ४४८इतका कोरोना रुग्णांचा आकडा झाला. शुक्रवारी सकाळी नाशिक महापालिका क्षेत्रात १३ नवे रुग्ण आढळले तर संध्याकाळी पाच रुग्ण आढलले.शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार शहरात महापालिका क्षेत्रात सातपूर कॉलनीमध्ये आठ तर पाथर्डीफाटा, पाटीलनगर, नवीन सिडको, श्रीकृष्णनगर, पंचवटीतील हिरावाडी या भागात प्रत्येकी एक असे एकूण १३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. तसेच संध्याकाळी आलेल्या अहवालांमध्ये इंदिरानगर, कोणार्कनगर, धात्रकफाटा, तारवालानगर या भागांमध्येही प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला.एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला जात असल्याचे दिवसभराच्या चित्रावरून दिसून आले. तसेच आता दुकाने खुली ठेवण्याची वेळ देखील सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे. गुरूवारी शहरातील बाजारपेठांमधील काही भागात नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चांगलीच गर्दी केली होती असेच चित्र शुक्रवारीसुध्दा पहावयास मिळाले. शुक्रवारी वाइन शॉपदेखील खुले केले गेले. यामुळे वाइन खरेदीसाठीही मद्यपी घराबाहेर पडले; मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आखलेल्या नियोजनामुळे शहरात काही अपवाद वगळता फारसा गोंधळ सोमवारप्रमाणे वाइनशॉपच्या बाहेर पहावयास मिळाला नाही. महिन्याचा पहिला आठवडा पूर्ण होत असल्याने किराणा दुकानांवरदेखील आता महिन्याचा किराणा भरण्यासाठी रांगा नजरेस पडू लागल्या आहेत.कोरोना अपडेट्स

पॉझिटिव्ह रूग्णसंख्या अशी...

  • नाशिक ग्रामिण - ६१
  • नाशिक मनपा - ४४
  • मालेगाव मनपा - ४४८
  • जिल्हा बाहेरील - १९
  • एकूण - ५७२

 

  1. पुर्णपणे बरे झालेले रुग्ण ४६
  2. कोरोणाग्रस्त एकूण १९ रुग्णांचा बळी (मालेगावमधील १८)
  3. रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण एकूण ४९४
  4. अद्याप ५६६ कोरोना नमुना चाचणी अहवालांची प्रतीक्षा कायम
  • आजपर्यंत ५ हजार ७६ नमुने कोरोना चाचणीकरिता पाठविण्यात आले, त्यापैकी५७२ पॉझिटिव्ह तर ३ हजार ९३८ संशयित रूग्णांचे नमुने निगेटीव्ह प्राप्त झाले.

 

  • सध्या ५०७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
  • सध्या ७३१ कोरोना संशयित रुग्ण उपचारार्थ जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका