मालेगाव : शहरातील ४४ रुग्णांचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. उपचार घेणारे कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी जात असून, काल ४३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसे सुखावलेल्या मालेगावकरांना आज ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने धक्का बसला.शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी होईल, असे वाटत असताना मंगळवारी आलेल्या अहवालामुळे प्रशासनापुढे आणखी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कालपर्यंत १२७ रुग्ण होते त्यात ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण १५९ रुग्ण झाले आहेत. शहरात बाधित ४४ रुग्णांत २१ पुरुष, १४ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. यापैकी ४ रुग्ण जुने असून, त्यांच्या दुसऱ्या नमुन्याची तपासणी करण्यासाठी सॅम्पल पाठविले होते. हे रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त होण्यास अजून काळ लागणार आहे.
मालेगावी एकाच दिवसात ४४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 8:31 PM