दिंडोरी : तालुक्यात औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पालखेड औद्योेगिक वसाहतीतील पीपीई किट बनविणाºया एका कंपनीतील ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे. पालखेड ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाने कंपनीला या बाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.दिंडोरी तालुक्यात औषधे बनवणाºया अनेक कंपन्याअसून यातील एक कंपनी कोरोना पीपीई किट बनविण्याचे काम करते. पहिल्या कडक लॉकडाऊनमध्ये कंपनीने अत्यावश्यक सेवा असल्यामुळे काम सुरु ठेवले होते. या कंपनीत आता ४४ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त प्रशासनाला देण्यात आले आहे.हे पॉझिटिव्ह रु ग्ण लो रिस्क मधले असून ते नाशिक येथील रहिवासी असल्याने त्यांना नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कोविड सेंटरला पाठविण्यात आले आहे. तसेच या पॉझिटिव्ह रु ग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क असलेल्याची माहिती घेतली जात असून त्यांनाही नाशिकमध्ये होम कॉरंनटाईन करण्यात येणार आहे. दरम्यान रु ग्ण आढळून आल्यानंतर पालखेड ग्रामपंचायतीने आता ही कंपनी बंद करण्याचे पत्र दिले आहे.यापूर्वी दोन कारखान्यात नऊ रु ग्ण आढळले असून अवनखेड येथील एका कंपनीत ३ रु ग्ण आढळले असल्याने या सर्व कंपनीचे विभाग आठ दिवस बंद करण्यात आले आहेत.कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव हा गावांबरोबरच कंपनीमध्येही दिसू लागल्याने सर्व कंपनी व्यवस्थापन याची वेळोवेळी मिटिंग घेत मार्गदर्शन करून सूचना देत आहेत. तसेच प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने कंपनीची पाहणी करत आहे. दिंडोरी तालुक्यातील कंपनीमध्ये नाशिक शहरातून येणाºया कामगारांची संख्या अधिक असल्याने कंपनी व्यवस्थापनास याबाबत दक्ष राहून शासनाच्या नियम व शर्तीचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे.- डॉ. संदिप आहेर, प्रांताधिकारी, दिंडोरी-पेठ.दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत दररोज रु ग्ण संख्या वाढत असून, त्या प्रमाणात रु ग्ण बरे होऊन घरीही सोडले जात आहेत. खबरदारी म्हणून कामगारांबाबत काळजी घेण्यात यावी अश्या सूचनाही दिल्या आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या बाबतीत भीती न बाळगता, मास्कचा वापर, सोशल डिंस्ट्स ठेवून आपले कामकाज करावे.- डॉ. सुजित कोशिरे, तालुका आरोग्य अधिकारी, दिंडोरी.
पीपीई कीट बनविणाऱ्या कंपनीत ४४ कामगार पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 8:18 PM
दिंडोरी : तालुक्यात औद्योगिक वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पालखेड औद्योेगिक वसाहतीतील पीपीई किट बनविणाºया एका कंपनीतील ४४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे. पालखेड ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाने कंपनीला या बाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यात आठ दिवस कंपनी बंद करण्याचा निर्णय