शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

४४,५५२ झोपडीधारकांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:16 AM

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ४३५५२ झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, या लाभार्थ्यांना पीपीपीद्वारे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत अन्य तीन घटकांसाठी प्राप्त ५०,९२६ अर्जांपैकी ४४,४६४ लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०,१५४ लाभार्थ्यांना कर्ज संलग्न व्याज अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे तर ३८,७५४ लाभार्थ्यांसाठी खासगी भागीदारीद्वारे परवडणाºया घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.

नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ४३५५२ झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, या लाभार्थ्यांना पीपीपीद्वारे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत अन्य तीन घटकांसाठी प्राप्त ५०,९२६ अर्जांपैकी ४४,४६४ लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०,१५४ लाभार्थ्यांना कर्ज संलग्न व्याज अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे तर ३८,७५४ लाभार्थ्यांसाठी खासगी भागीदारीद्वारे परवडणाºया घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. नाशिक महापालिकेमार्फत सदर योजनेसाठी गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. सदर योजना वेगवेगळ्या चार घटकांमध्ये राबविली जात आहे. त्यात, पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांचा ‘आहे तेथेच पुनर्विकास’ केला जाणार आहे. महापालिकेने या घटकांतर्गत शहरातील यापूर्वीच्या घरकुल योजनेत समाविष्ट नसलेल्या विभागनिहाय झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ४३ हजार ५५२ झोपडीधारकांची नोंद घेण्यात आलेली आहे. यामध्ये आता सन २००० पूर्वीच्या झोपडीधारकांसाठी पीपीपीद्वारे घरकुल योजना साकारली जाणार असून, खासगी विकासकांना त्यासाठी प्रोत्साहित करण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. या घटकांतर्गत लाभार्थ्यांना ३० चौ.मी. क्षेत्रफळाचे घरकुल सर्व सोयींसह बांधून देण्याची संकल्पना आहे. म्हाडाकडे यादी सुपूर्द खासगी भागीदारीद्वारे परवडणाºया घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ३८,७५४ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या लाभार्थ्यांसाठी म्हाडामार्फत घरकुल उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिकेने १९९ घरकुलांसाठी प्रस्तावही म्हाडाकडे सादर केला आहे. म्हाडामार्फत आडगाव आणि कामटवाडे याठिकाणी सुमारे ६०० घरकुलांची योजना आहे. त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पात्रतेनुसार सामावून घेण्यात येणार आहे. बॅँकांकडून वित्तीय सहाय्य घटक क्रमांक दोननुसार कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांची निर्मिती केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार बॅँका, गृहनिर्माण वित्तीय संस्थांमार्फत सदर घटकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. महापालिकेने घटक दोन आणि तीन अंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लीड बॅँक असलेल्या बॅँक आॅफ महाराष्टÑकडे रवाना केल्या असून, त्यांच्यामार्फत छाननीचे काम सुरू आहे. याशिवाय, घटक चार अंतर्गत लाभासाठी महापालिकेच्या नगररचना आणि बांधकाम विभागाला सविस्तर प्राकलन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.