नाशिक : जिल्हा परिषद गट व गणांसाठी उमेदवारी अर्ज छाननीत ७३ गटांसाठी ७८९, तर १४६ गणांसाठी १२७३ अर्ज वैध ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ६) जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ८५०, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १४३५ अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज छाननीत गटांसाठी एकूण ३०, तर गणांसाठी एकूण ५९ अर्ज अवैध ठरविण्यात आले. वैध ठरविण्यात आलेल्या नऊ तालुक्यांतील वैध अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे- बागलाण- ८१, मालेगाव- ५५, देवळा- ५०, कळवण- ३४, सुरगाणा- २५, पेठ- १४, दिंडोरी- ६९, चांदवड- ५५, नांदगाव- ५४, येवला- ५६, निफाड- १२१, नाशिक- ४८, त्र्यंबकेश्वर- २२, इगतपुरी- ५७, सिन्नर- ४८ अशी एकूण वैध अर्जांची संख्या ७८९ आहे, तर पंचायत समिती गणातील वैध अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे- बागलाण- १११, मालेगाव- १०४, कळवण- ७८, सुरगाणा- ३८, देवळा- ६९, पेठ- ३२, दिंडोरी- ११७, दिंडोरी- ११७, चांदवड- ९४, नांदगाव- ९१, येवला- ९०, निफाड- २०४, त्र्यंबकेश्वर - ५२, इगतपुरी- १०१, सिन्नर- ९२ असे एकूण १२७३ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. अर्ज माघारीसाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, अर्जांवर अपील असल्यास १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. येत्या २१ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)
गटांसाठी ४४९, गणांसाठी ६८६ अर्ज वैध
By admin | Published: February 08, 2017 1:13 AM