पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचवटी विभागातील सहा प्रभागातून एकूण ३६ इच्छुक उमेदवारांनी ४५ उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी इच्छुकांनी पंचवटी विभागीय कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांत विद्यमान नगरसेवक दामोदर मानकर तर माजी नगरसेवकांत भगवान भोगे, वसंत मोराडे यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये अ जागेसाठी कविता साळवे यांनी भाजपाकडून तर ज्योती पलंगे यांनी शिवसेनेकडून अर्ज सादर केला आहे. ब जागेसाठी विद्यमान नगरसेवक गणेश चव्हाण यांच्या पत्नी जयश्री चव्हाण यांनी शिवसेनेकडून अर्ज सादर केला आहे. प्रभागातील क जागेसाठी भाजपाकडून अमित घुगे, भारत पाटील, विशाल कदम, शिवसेना, सोमनाथ वडजे मनसे तर वसंत मोराडे, दीपक मोराडे, अरुण पिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. प्रभाग २ ड जागेसाठी विद्या शिंदे यांनी भाजपा, मनसेकडून सुवर्णा शिंदे तर शिवसेनेकडून प्रतिभा इंगळे यांनी अर्ज सादर केले. प्रभाग ३ मधील अ जागेसाठी बाळासाहेब सूर्यवंशी, संदीप भवर मनसे, सचिन दप्तरे, अभिजीत राऊत यांनी अपक्ष, हेमलता वाघ यांनी ब गटातून अपक्ष तर क गटातून शिवसेनेकडून तसेच पूनम मोगरे यांनी ब गटातून शिवसेनेकडून अर्ज दाखल केले. ड गटातून मनसेकडून सचिन आढळकर यांनी अर्ज दाखल केला. प्रभाग ४ अ गटातून ठकूबाई सपकाळे, क गटातून भास्कर लोणारे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक भगवान भोगे, सविता बडवे, यांनी तर भाजपाकडून उत्तम उगले यांनी अर्ज सादर केला आहे. ड गटातून मुकेश गांगुर्डे, ललिता लहांगे, योगेश कापसे, राजू जेऊघाले यांनी तर प्रभाग ५ ड मधून तुषार पगारे, माजी खासदार यांचे पुत्र संजय पाटील यांनी भाजपाकडून प्रभाग ६ ब मधून कल्पना ताडगे, सुनीता पिंगळे, क मधून सोनाली काळे, तर ड मधून गणेश धोत्रे व भाजपाकडून नगरसेवक दामोदर मानकर अशांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. (वार्ताहर)
पंचवटी विभागात ४५ उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: February 03, 2017 1:15 AM