शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

४५ गावे टॅँकरमुक्त; यंदा चारच गावांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 8:59 PM

सटाणा :यंदा ऐन उन्हाळ्यात दरवर्षी येणाऱ्या पाणी संकटाऐवजी कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी लॉकडाउनसारखा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र जाणवत असले तरी बागलाणमध्ये या निमित्ताने पाण्याची नासाडी थांबली आहे. परिणामी यंदा आवर्तन सोडण्याच्या मागणीने जोर धरला नाही.

सटाणा : (िनतीन बोरसे ) यंदा ऐन उन्हाळ्यात दरवर्षी येणाऱ्या पाणी संकटाऐवजी कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी लॉकडाउनसारखा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र जाणवत असले तरी बागलाणमध्ये या निमित्ताने पाण्याची नासाडी थांबली आहे. परिणामी यंदा आवर्तन सोडण्याच्या मागणीने जोर धरला नाही. आज पाण्याचे कोणतेही स्रोत नसलेल्या आणि नेहमी टॅँकरच्या प्रतीक्षेत राहणाºया चार वाड्यावगळता सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे बागलाण आजतरी पाण्याच्या बाबतीत संतुष्ट असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने ४५ गावे टॅँकरमुक्त झाली आहेत. त्यामुळे यंदा चारच गावांकडून टॅँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. त्यातील दोन गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरूही झालेला आहे.यं दा बागलाणमध्ये परतीच्या पावसामुळे खरीप वाया गेला असला तरी सलग चार वर्षांपासून दुष्काळाशी सामना करणाºया शेतकऱ्यांचा मात्र नक्कीच दुष्काळ हटला आहे. विहिरींना मुबलक पाणी आल्यामुळे रब्बी हंगाम शंभर टक्के हातात आला, बागलाणमधील मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, दोध्याड आदी उपनद्या, नाले फेब्रुवारीपर्यंत वाहिल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळाली. तालुक्यातील वायगाव, अजमीर सौंदाणे, कºहे, चौगाव, देवळाणे, सुराणे, रातीर, रामतीर, सारदे हा भाग नेहमीच अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असतो. यंदा सुराणे येथील लघुप्रकल्प तब्बल सात वर्षांनी भरल्याने या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत मिळाली आहे. दरम्यान, यंदा मुबलक प्रमाणात पाणी असले तरी मोठ्या गावांमध्ये अतिपाण्याच्या उपशामुळे टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे मार्च महिन्यात हे संकट घोंगावत असताना कोरोनासारख्या महाभयंकर संकटाने तोंड वर काढले. या संकटाशी सामना करण्यासाठी शासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न केले. लॉकडाउन सारखा न परवडणारा प्रयत्नदेखील आज करावा लागत आहे. त्याचे परिणामदेखील सर्वच क्षेत्रात जाणवत असताना लग्नकार्य, विविध कार्यक्रम, विनाकारण होणारा पाण्याचा उपसा यामुळे साहजिकच पाण्याची नासाडी होते. ती या लॉकडाउनमुळे नक्कीच थांबण्यास मदत मिळाली आहे. त्यामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांमधून पाण्याची मागणी झाली नाही. साहजिकच पाण्याच्या मुबलकतेमुळे बागलाण आजतरी संतुष्ट असल्याचे दिसून येत आहे.-------------------------------------------पुनंद पाणीपुरवठा योजना रखडलीसटाणा शहरासाठी मंजूर असलेल्या पुनंद पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम मात्र कोरोनामुळे रखडले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना या महाभयंकर संकटामुळे लॉकडाउन करावा लागला. याचा परिणाम योजनेच्या कामावर झाला आहे. गेल्या मार्च अखेरीस जलवाहिन्या चाचणी करण्याचे काम पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात शहराला पुनंदचे पाणी मिळणार होते. मात्र लॉकडाउनमुळे काम रखडले आहे. असे असले तरी चणकापूर, पुनंद आणि केळझरच्या आवर्तनामुळे ठेंगोडा पाणीपुरवठा योजना सुरळीत आहे. परिणामी, टंचाईच्या झळा आजतरी शहराला बसत नसल्याचे चित्र आहे.------------------------------यंदा टॅँकरची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परतीच्या पावसामुळे सर्वच जलाशय शंभर टक्के भरली असल्यामुळे तब्बल४५ गावे टॅँकर मुक्त झाली. यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कातरवेल, दोधनपाडा, वघाणेपाडा आणि रातीर या चार गावांचे टॅँकरचे प्रस्ताव आले असून, कातरवेल, दोधनपाडा येथे टॅँकर मंजूर करण्यात आले आहे. लवकरच उर्वरित गावांना टॅँकर सुरू करण्यात येईल.- जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाण-----------------------------------१ बागलाणमध्ये सटाणा शहरानंतर नामपूर गाव हे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. मोसम तीरावरील हे गाव एकेकाळी उसाचे आगार म्हणून ओळखले जात असे. मात्र मसाल्याची बाजारपेठ, आडकित्तासाठीदेखील हे गाव उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.२ साहजिकच हे गाव आज बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. सहकारमहर्षी व शिखर बँकेचे माजी उपाध्यक्ष कै. जयवंतराव सावंत यांनीदेखील या गावचे अनेक वर्ष नेतृत्व केले. त्यांचा गावाच्या विकासात सिंहाचा वाटा आहे.३ त्यांच्या काळात केलेल्या पाणी योजनाच आतापर्यंत नामपूरकरांची तहान भागवत आहे. कालांतराने सत्तापरिवर्तनझाले आणि पाणी योजनेलाग्रहण लागले. नामपूर गावटॅँकरग्रस्त गावांच्या यादीत एक नंबरला आले.४ तीन वर्षांपूर्वी डॉ. दिकपाल गिरासे यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन युती सरकारने सिमेंट बंधाºयाला मंजुरी दिली. नामपूरजवळ मोसम नदीवर बांधलेल्या या बंधाºयामुळे पाण्याचे स्रोत जिवंत होऊन आज नामपूर गाव टंचाई मुक्त झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक