वटार :येथील प्रल्हाद काशिनाथ बागुल यांच्या शेतातविजवाहीच्या शॉकिसर्कटमुळे सव्वा एकर डाळिंब बागेचे ४५० झाडे जळून खाक झाले आहेत. त्यात ठिबक सिंचनच्या नळ्या पूर्ण पणे जळाल्या असून संबधित शेतकऱ्याचेजवळपास पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.तेल्या व मर सारख्या भस्मासुर रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत. संकटांमुळे शेकार्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. उन्हाळ्यात थोडे फार पाणी आता ऐन पावसाळ्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तुटपुंज्या पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळ तयार केली पण अचानक दुपारच्या भरात वाºयामुळे विजवाहिनींचा एकमेकांना स्पर्श झाल्याने खाली आगीचे गोळे पडले.सदर घटनेची माहिती मिळताच बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी केली व संबधित अधिकाºयांना नुकसान भरपाई देण्याचे आवाहान केले.कृषी अधिकारी राहुल सोनवणे, सचिन ठोके वायरमन ह्या सर्व अधिकाºयांनी पंचनामा केला.यावेळी राजेंद्र सोनवणे, माजी सरपंच प्रशांत बागुल, हरिभाऊ खैरनार, बाळुनाना खैरनार, पोपट खैरनार, मुरलीधर खैरनार, नाना खैरनार, मधुकर गागुर्डे, वाल्मिक सोनवणे, आदी शेतकरी उपस्थित होते.
डाळिंब बागेचे ४५० झाडे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 4:25 PM
वटार : येथील प्रल्हाद काशिनाथ बागुल यांच्या शेतातविजवाहीच्या शॉकिसर्कटमुळे सव्वा एकर डाळिंब बागेचे ४५० झाडे जळून खाक झाले आहेत.
ठळक मुद्देतेल्या व मर सारख्या भस्मासुर रोगांनी परिसरातील डाळिंब बागा ग्रासल्या आहेत. संकटांमुळे शेकार्यांनी डाळिंब बागा उपटून टाकल्या आहेत. उन्हाळ्यात थोडे फार पाणी आता ऐन पावसाळ्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तुटपुंज्या पाण्यावर व महागडी औषेधांची फवारणी करून फळ तयार