लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील वाढत्या चोऱ्या, घरफोडी व चेनस्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशानुसार शनिवारी सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ यामध्ये ४७ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली़शहरात राबविण्यात आलेल्या या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये ६ तडीपारांची तपासणी, ४८ हॉटेल लॉजिंगची तपासणी, मुंबई पोलीस कायद्यान्वये ८३ नागरिकांवर तसेच १४४ रिक्षांची तपासणी करून ३ हजार २०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़ यावेळी अधिकाऱ्यांनी विविध सोसायट्यांमध्ये जाऊन प्रबोधन केले़ त्यामध्ये सीसीटीव्ही बसविणे, बाहेरगावी जाताना मौल्यवान ऐवज लॉकरमध्ये ठेवणे, मोबाइल फोनवर बँकेचे माहिती न कळविणे, दुचाकी सुरक्षित ठिकाणी लावावी, पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्यांबाबत त्वरित तक्रार करण्याचे तसेच सुटीत गावाला जाताना आपल्या मौल्यवान वस्तुंची काळजी घेण्याचे सूचना नागरिकांना विशेषत: महिलावर्गाला करण्यात आल्या़या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले दोन पोलीस उपआयुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, १३ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ३२ अधिकारी व १४४ कर्मचारी सहभागी झाले होते़ यावेळी महिलांनी शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंगबाबत चिंता व्यक्त केली़
कोम्बिंगमध्ये ४७ गुन्हेगारांची तपासणी
By admin | Published: May 08, 2017 1:50 AM