ठळक मुद्देपिंपळगांव बसवंत येथे १७ रु ग्ण आढळले आहे.
निफाड : तालुक्यात सोमवारी (दि.७) सायंकाळी पाच वाजेपासून मंगळवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ४७ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.पिंपळगांव बसवंत येथे १७ रु ग्ण आढळले आहे. ओझर येथे ११ रु ग्ण आढळले आहे. निफाड येथे ४ रु ग्ण आढळले आहेत. गोरठाण, चाटोरी, आहेरगाव, भुसे या गावांमध्ये प्रत्येकी २ रु ग्ण आढळले आहेत. मौजे सुकेणे, कोठुरे, सोनगाव, दावचवाडी, शिवडी, कसबे सुकेणे, करंजगाव आदी गावांमध्ये प्रत्येकी १ रु ग्ण आढळला आहे.