जायखेडा : येथील कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय व संपर्कातील अशा ४७ जणांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यातील १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे.बागलाणचे प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला सूचना करीत गाव १४ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि. ११) येथील ३२ वर्षीय खासगी वाहनचालकास मालेगाव येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्याची कोरोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला. यंत्रणेने तातडीने त्याचे कुटुंबीय व त्याच्यावर उपचार करणारे स्थानिक खासगी डॉक्टर,संपर्कातील व्यक्ती अशा ४७ जणांना विलगीकरण केंद्रात दाखल केले आहे. यांच्या स्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते.पैकी दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जायखेडा व परिसरात भीतीचे वातावरण निर्माणझाले आहे. प्रातांधिकारी भांगरे, गटविकास अधिकारी कोल्हे, वैद्यकीय अधिकारी उमेश रामोळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, सरपंच शांताराम अहिरे, संदेश मोरे, चंद्रसिंग सूर्यवंशी, सर्कल आॅफिसर एस. के. खरे, तलाठी एस. बी. घोडेराव, ग्रामविकास अधिकारी किशोरभामरे, एस. जी. कापडणीस आदी परिस्थितीवर लक्ष ठेवूनआहेत.
---------------------------अत्यावश्यक सेवा सुरू : गाव १४ दिवस बंद; परिसर सीलजायखेड्यातील पॉझिटिव्ह व संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, ४७ व्यक्तींना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे. यात सोमपूर, जयपूर (मेढीपाडे), वाडीपिसोळ, व जायखेडा येथील व्यक्तींचा समावेश आहे. पॉझिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींनी स्वत:हून यंत्रणेशी संपर्कसाधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.