सटाणा मर्चटस् को. ऑप. बँकेच्या सभागृृहात आयोजित पत्रकार परिषदेत चेअरमन कैलास येवला यांनी सांगितले, कोरोना महामारी असताना समको बँकेस २ कोटी ८२ लाख ३९ हजार इतका झाला आहे.
बँकेचे वसूल भागभांडवल रुपये ३ कोटी १० लाख ४० हजार असून एकूण ठेवी ९७ कोटी १४ लाख २८ हजार तर एकूण कर्ज वाटप ४९ कोटी २९ लाख २३ हजार रुपये झाले आहे. एकूण गुंतवणूक ६४ कोटी ८४ लाख ६४ हजार इतकी असून एकूण थकबाकी ४ कोटी ३२ लाख ३४ हजार रुपये आहे. गत आर्थिक वर्षापेक्षा ठेवीमध्ये रुपये ५ कोटी ६ लक्ष रुपयांनी वाढ झाली आहे. तर कर्जामध्ये ५ कोटी ५६ लक्ष रुपयांनी वाढ झाली आहे. यावेळी संचालक पंकज ततार, जयवंत येवला, दिलीप चव्हाण, शरद सोनवणे, प्रवीण बागड, सौ. रूपाली कोठावदे, जगदीश मुंडावरे, प्रकाश सोनग्रा, तुषार खैरणार व बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी देवीदास बागडे, शाखाधिकारी जितेंद्र बागड, मिलिंद शिवदे व वसुली अधिकारी भारत पवार उपस्थित होते.
इन्फो
सभासदांसाठी विमा योजनेचा मानस
येत्या काळात बँकेच्या वतीने विविध नवीन कर्ज वितरण योजना, ठेवी व कर्ज व्याजदरात कपात करण्याचा विचार असून सभासदांसाठी विमा योजना राबविण्याचा मानस असल्याची माहिती यावेळी चेअरमन कैलास येवला व व्हा. चेअरमन कल्पना येवला यांनी दिली.
फोटो- ०९ कैलास येवला
===Photopath===
090421\09nsk_10_09042021_13.jpg
===Caption===
फोटो- ०९ कैलास येवला