नाशिक : नवरात्रौत्सवाच्या कालावधीत होणाऱ्या गर्दीचा फायदा व एकटे गाठून मोबाईल व रोख रकमेची लूट करणा-या झारखंडमधील पाच जणांच्या टोळीस सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून एकूण ४ लाख ९५ हजार ८०० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहे़ या टोळीत झारखंड येथील दोन विधीसंघर्षित बालकांचाही समावेश असून या संशयितांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२२) पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली़
दसºयाच्या दिवशी पंचवटीतील पांडुरंग दुसाने हे मुलासह फुले खरेदीसाठी जात असताना तिळभांडेश्वर लेनमध्ये सात -आठ संशयितांनी अडवून चाकूचा धाक दाखवित रोख रक्कम व मोबाईल लूटून नेला होता़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत करीत होते़ त्यांना संशयित कपालेश्वर मंदिराच्याजवळील धर्मशाळेत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार संशयित सदानंद जोगिंद्र चौधरी (३२), कुंदनकुमार उपेंद्र चौधरी (२२), श्रवणकुमार शंकर महातो (२६), मुकेश रामचंद्र महातो (२५), चंदनकुमार उमेश महातो (२५, सर्व रा. झारखंड) व दीपक बाळासाहेब चौधरी (३०, रा. फुलेनगर, पंचवटी) या संशयितांसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले़
पोलिसांनी या संशयितांची चौकशी व झडती घेऊन चोरी केलेले १५ मोबाईल तसेच शिर्डी येथील खोलीतून १५ असे ३० मोबाईल जप्त केले़ या टोळीकडून मोबाईल चोरीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले,सहायक पोलीस निरीक्षक व्हि. ए. शेळके, उपनिरीक्षक ए. एस. बागुल, हवालदार बाळकृष्ण उगले, पोलीस नाइक प्रशांत मरकड, रविंद्रकुमार पानसरे यांनी ही कामगिरी केली़ यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते़
शहरातील संशयितास सोबत घेऊन मोबाईल चोरीशहरातील एका संशयितास सोबत घेऊन ही टोळी मोबाईल चोरी करीत होती़ चोरी केलेले मोबाईल शिर्डीतील आपल्या सदस्यांकडे पाठवून ते पुन्हा नाशिकला येत होते़ संशयित उगले यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़