सिन्नर : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.दहावीच्या मुख्य परीक्षेत इंटरमिजिएट परीक्षेला ‘अ’ ग्रेडला ०७ गुण, ‘इ’ ग्रेडला ०५ गुण, तर ‘उ’ ग्रेडला ०३ अतिरिक्त गुण मिळतात. तसेच भविष्यात अनेक वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना तसेच काही शासकीय कार्यालयात या परीक्षांच्या प्रमाणपत्र पदोन्नतीसाठी उपयोग होत असल्याने या परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा व पालकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भारतातील एकूण १३ राज्यांमध्ये ही परीक्षा एकाच वेळी होते. त्यामुळे या परीक्षांना राष्ट्रीयस्तर प्राप्त झालेला आहे. यावर्षी महाराष्ट्रातून साडेसहा लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. एलिमेंटरी परीक्षेत मयूर जाधव, तुषार मैंद हे विद्यार्थी अ श्रेणीमध्ये, तर अथर्व काळे, अनिकेत ओझा, धनंजय पगार, नयन परदेशी, रेहान सय्यद, अजय सूर्यवंशी, यश तुपे, सत्यम आंधळे, वैभव हेंबाडे, पीयूष जाधव आदी विद्यार्थी इ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले. प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षक सुनील हांडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. इंटरमिजिएट परीक्षेत युवराज वाघ, प्रथमेश भदाणे, ओम क्षत्रीय, दर्शन बोºहाडे, आदित्य गडाख, श्रेयस गर्जे, प्रथमेश क्षत्रिय, शुभम पेढेकर, ललित उगले या विद्यार्थ्यांनी ए ग्रेड, तर मनीष अहिरे, वेदांत यंदे या विद्यार्थ्यांनी बी ग्रेड मिळवली. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक राहुल मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
रेखाकला परीक्षेचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:23 PM
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
ठळक मुद्देसिन्नर । ब. ना. सारडा विद्यालयाने राखली परंपरा