शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

जिल्ह्यात रब्बीची ८१ टक्के पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:40 AM

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) ...

नाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्रापैकी ९२ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावर (८१.६२ टक्के) विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली असून, गव्हाची सर्वाधिक ५१,९३९ हेक्टरवर तर त्या खालोखाल हरभऱ्याची ३०,२५७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळे ज्वारीचा पेराही वाढला असून, जिल्ह्यात एकूण ४५९४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. दुष्काळी समजल्या जाणाºया सिन्नर तालुक्यात यावर्षी निश्चित क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर (२८५२ हेक्टर) ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे, तर मालेगाव तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढले असून, या तालुक्यात तब्बल ९११७ हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. पेठसारख्या आदिवासी तालुक्यात यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेण्याचा प्रयोग केला असून, तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र नसतानाही १० हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.यावर्षी झालेला समाधानकारक पाऊस, धरण साठ्यांमध्ये झालेली वाढ यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी विहिरी, नदी, नाले भरलेले असल्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी देता येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शेतकºयांना अपेक्षा आहे. जिल्हात तृणधान्याचे एकूण ७०,७६४ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी आतापर्यंत ६०,१३० हेक्टरवर ज्वारी, गहू, मका आणि इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. तृणधान्यामध्ये गव्हाला शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. गव्हाच्या ६१,९६७ हेक्टर क्षेत्रापैकी ५१,९३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मालेगाव तालुक्यात गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात ९११७ हेक्टरवर शेतकºयांनी गव्हाची पेरणी केली आहे. सिन्नर तालुक्यातही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.डाळवर्गीय पिकांमध्ये यावर्षी हरभºयाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असून एकूण ४११८४ हेक्टर क्षेत्रापैकी ३०२५७ हेक्टरवर शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली आहे. दिंडोरी, सिन्नर, येवला, मालेगाव या तालुक्यांमध्ये हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे. कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ या तालुक्यातील शेतकºयांनी हरभºयाबरोबच इतर डाळवर्गीय पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांचे एकूण ४२१५२ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ३२२४६ हेक्टरवर शेतकºयांनी डाळवर्गीय पिकांची पेरणी केली आहे. जवस, तीळ, सूर्यफूल या तेलबीयांचा पेरा खूपच कमी झाला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती