कोरेानाचा विळखा आता सैल होत असून त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळत असल्याचे चित्र सध्या उपबल्ध राहीले आहे. महापालिकेकडे उपलब्ध असलेली खाटांची रिक्त संख्या ही त्याचेच द्योतक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण कमी झाले आणि नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यात तर जणू कोरोना संपला असेच चित्र होते. मात्र फेब्रुवारी अखेरीस पासून पुन्हा संख्या वाढु लागली आणि मार्च तसेच एप्रिल महिन्यात कोरोनाचा कहर झाला एकेका बेडसाठी रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक झुंजत होते कोणी अधिकाऱ्यांचे तर केाणी राजकारण्यांचे वशीले लावत होते. काहींचा तर बेड अभावी मृत्यू झाल्याच्या देखील घटना चर्चेत आल्या होत्या.
दरम्यान, आता मे महिन्याच्या प्रारंभापासून रूग्णसंख्येत घट होऊ लागली आणि आलेख उतरताच आहे. संपूर्ण जिल्ह्याची रूग्ण संख्या हजाराखाली आली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील कोविड रूग्णालयातील बेड मोठ्या प्रमाणात रिक्त होऊ लागले आहेत. नाशिक शहरात एकूण १८८ कोविड रूग्णालय असून यात ८ हजार २१४ बेडस उपलब्ध करून देण्यात आले होते.जनरल, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स तसेच आयसीयु अशा सर्वच बेडचा त्यात समावेश होता आता त्यातील ५ हजार २६५ बेड रिक्त आहेत.
इन्फो...
केविड केअर सेंटर्समध्ये ३ हजार ७०५ बेडस उपलब्ध होते त्यापैकी १ हजार ३०५ बेडस उपलब्ध झाले आहेत त्यामुळे अनेक कोविड केअर सेंटर्स महिना अखेरीस बंद होण्याची शक्यता आहे.