सातपूर : सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णापैकी सुमारे ५ हजार ७४१ रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शनची गरज आहे. सद्यस्थितीत सुमारे ५ हजार ८२० रेमडीसिवीर इंजेक्शन विक्रीकरीता उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली. शहरात आणि जिल्ह्यात कोविड१९ आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रुग्णालये हाऊसफुल होत आहेत.त्यामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणा सूक्ष्म नियोजन करीत आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज निर्माण होत आहे. रेमडीसीवर इंजेक्शनची गरज भासत आहे.याबाबत अन्न व औषध प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय योजना आणि सूक्ष्म नियोजन केले आहे. कोविड रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्समध्ये रेमडीसिवर इंजेक्शन विक्रीकरीता उपलब्धता केली आहे. सद्यस्थितीत कोविड रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील व मागणीप्रमाणे रुग्णालयांना त्याचा पुरवठा होईल याबाबत नियोजन केलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. औषधाची व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व उत्पादक,वितरक, रुग्णालयाचे प्रतिनिधी यांचेबरोबर समन्वय साधण्यात येत आहे.सद्य परिस्थितीत अन्न व औषध प्रशासन कार्यालय आठवड्याचे सर्व दिवस कार्यालयीन वेळेत सुरु रहाणार असून औषधाची व मेडिकल ऑक्सिजन संदर्भात अडचणी असल्यास ९८५०१७७८५३ व ९८६९११४९९८, ८७८०१८६६८२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांनी केले आहे.ऑक्सिजनचा साठा शिल्लकजिल्ह्यातील दहा उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयांकरिता सद्यस्थितीत ८०.९१ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून वरीलप्रमाणे रुग्णांची संख्यासाठी आवश्यक असलेले मेडिकल ऑक्सिजनचे प्रमाणाची कमाल संख्या ५६ मेट्रिक टन उपलब्ध असल्याचे सांगण्यात करण्यात आले आहे. ८०.९१ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचे वितरण केल्यानंतर देखील २८.४४ मेट्रिक टनचा उर्वरित साठा शिल्लक रहाणार आहे.
जिल्ह्यासाठी 5 हजार 820 रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 1:36 AM
सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णापैकी सुमारे ५ हजार ७४१ रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शनची गरज आहे. सद्यस्थितीत सुमारे ५ हजार ८२० रेमडीसिवीर इंजेक्शन विक्रीकरीता उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली.
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाची माहिती : सूक्ष्म नियोजन सुरू