येवला : तालुक्यातील विखरणी येथील सराफ व्यवसायीकाला चाकूचा धाक दाखवून १ लाख ३० हजार रूपयांची लूट करणाºया टोळीतील पाच जणांना अवघ्या २४ तासात गजाआड करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.गुरूवारी (दि. १) मनमाड येथील सराफ व्यवसायिक संतोष दत्तात्रय बाविस्कर विसापूररोडने दुचाकीने मनमाडकडे जात होते. खडी क्र ेशर जवळ सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास मागून मोटार सायकलवर तीन अनोळखी इसम आले. त्यांनी बावीस्कर यांना थांबवुन स्कुटीवरु न खाली पाडले. एकाने चाकूने त्यांच्या डाव्याबाजूस दुखापत केली. वस्कुटीला अडकविलेली पिशवी काढुन मलायनकेले.त्यामध्ये सोन्याचे दागिने तसेच एक किलो चांदीचे जोडवे, पैजण, रोख २५ हजार रूपये व हिशोबाची डायरी असे एकुण १ लाख ३० हजार रु पयाचा ऐवज होता. या प्रकरणी बाविस्कर यांच्या तक्र ारीवरून तालुका पोलीस ठाण्यात लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.येवला तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहाय्य पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, पोलिस हवालदार माधव सानप, पोलिस कॉन्स्टेबल किरण पवार, आबा पिसाळ, सतिष मोरे, मुकेश निकम यांनी शिघ्रतेने गुन्ह्याचे घटनास्थळी पहाणी करीत तसेच बाविस्कर यांचे व्यवसायाचे ठिकाणी तातडीने भेटी देऊन आढावा घेतला. लुटमारी करणाºया अनोळखी गुन्हेगारांबाबत जनसंपर्कातुन माहीती मिळवली. अन् २४ तासात सदर गुन्ह्याचा मास्टरमाइंट चेतन शशिकांत पवार, (२२) रा. तिसगांव ता. चांदवड यास त्याची सासरवाडी गुजरखेड ता. येवला येथुन ताब्यात घेतले. चेतन पवार याच्याकडे सखोल तपास करु न त्याचे साथीदार समाधान सुकदेव मोर (२२), योगेश रमेश पवार (२०) दोघेरा. विखरणी ता. येवला, सतिष शिवाजी माळी (२२) रा. दरसवाडी ता. चांदवड, भुषण बाळू पवार(२७) रा. रायपुर ता. चांदवड यांना वेगवेगळ्या ठिकाणावरु न त्यांचा शोध घेवुन पकडले.दरम्यान, पकडलेल्या चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. लुटमार करणाऱ्यांपैकी एक साथीदार फरार आहे. पकडलेल्या ५ संशयीत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अधिक तपास राजपूत हे करीत आहेत.
सराफास लुटणाऱ्या टोळीतील ५ गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 10:25 PM
येवला : तालुक्यातील विखरणी येथील सराफ व्यवसायीकाला चाकूचा धाक दाखवून १ लाख ३० हजार रूपयांची लूट करणाºया टोळीतील पाच जणांना अवघ्या २४ तासात गजाआड करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्देअवघ्या २४ तासात येवला तालुका पोलिसांनी लावला छडा