विजयनगर व कानडी मळ्यातील नागरिकांना बसण्यासाठी या बाकांचा उपयोग होणार आहे. शहरातील कानडी मळा परिसरातील नगरसेवक शीतल कानडी, विजयनगर भागातील नगरसेववक संतोष शिंदे यांनी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह रहिवाशांना विश्रांती घेण्यासाठी तसेच बसण्यासाठी स्वखर्चातून व लोकसहभागातून परिसरात ५० बाके बसविली आहे. नुकतेच जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते या बाकांचे लोकार्पण करण्यात आले. लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रभागाचा विकास साधण्याचे काम या दोन्ही नगरसेवकांनी जबाबदारीने पार पाडले आहे. कानडी मळा, विजयनगर परिसरात रस्ते, गटारींची कामे मार्गी लागली आहेत. या दोन्ही प्रभागांत ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठांना सकाळ, सायंकाळच्यावेळी निवांत बसण्यासाठी बाकांची गरज ओळखून कानडी व शिंदे यांनी स्वखर्चातून तसेच लोकांकडून मदत गोळा करून ५० बाकांची व्यवस्था केली. सीमंतिनी कोकाटे यांनी नगरसेवक कानडी व शिंदे यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांच्या कामाची पध्दत व नियोजन अतिशय चांगले असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी सुनील कानडी यांच्यासह विजयनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला व नागरिक उपस्थित होते.
ज्येष्ठांना निवांतपणासाठी ५० बाकांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 6:02 PM