त्र्यंबकेश्वर :महाराष्ट्र शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास निधीतील अतिरिक्त निधीतुन निवृत्तीनाथ समाध संस्थानच्या समाधी मंदीर व पुढील कामासाठी गती मिळणार आहे. याबाबतचे पत्र अर्थमंत्रालया कडुन जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.अर्थसंकल्पातील अतिरिक्त बजेट मध्ये निवृत्तीनाथ समाधी संस्थानचा अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी समावेश करु न अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तशी घोषणा अर्थ संकल्पीय अधिवेशनात केली आहे. या बाबतचे पत्र अर्थ मंत्रालयाने नगरविकास मंत्रालयाकडे देण्यात येउन त्या बाबत नाशिक जिल्हाधिकारी यांच्या कडे देखील कळविण्यात आले आहे. तर जिल्हाधिकारी यांनी संस्थानला पत्राद्वारे कळविले आहे. त्याप्रमाणे देवस्थान संस्थानला करावयाच्या खर्चाचे प्रकरण पाठविण्यात आले आहे.या बाबतचे पत्र बुधवारी (दि.२६) रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविले असल्याची माहिती ह.भ.प. पंडीत महाराज कोल्हे यांनी दिली.ते म्हणाले आता निवृत्तीनाथ समाधी मंदीर व पुढील कामाला गती येणार आहे.कोट :- विशेष म्हणजे हे पन्नास कोटी तिर्थक्षेत्र विकासा कामांसाठी राज्यातील चार तिर्थक्षेत्र विकासाठी मंजुर करण्यात आले आहेत. त्यात निवृत्तीनाथ समाधी मंदीर व पुढील कामासाठी हा निधी असल्याने संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानला मंजुर केला आहे.पंडीतराव कोल्हे म्हणाले हा तिर्थक्षेत्र विकास निधी व्यतिरिक्त हा निधी असल्यामुळे अन्य तीन देवस्थानचा या अतिरिक्त निधीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे निवृत्तीनाथ समाधी मंदीराचे बांधकाम तर पुर्ण होईलच पण पुढील बांधकाम देखील करावयास चालना मिळेल व कामाला देखील गती मिळेल असा विश्वास समाधी संस्थानचे अध्यक्ष पंडीतराव कोल्हे यांनी व संस्थानतर्फेव्यक्त केला आहे.
निवृत्तीनाथ समाधी मंदीराच्या कामासाठी ५० कोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:28 PM
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास निधीतील अतिरिक्त निधीतुन निवृत्तीनाथ समाध संस्थानच्या समाधी मंदीर व पुढील कामासाठी गती मिळणार आहे. याबाबतचे पत्र अर्थमंत्रालया कडुन जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.
ठळक मुद्देनिवृत्तीनाथ समाधी संस्थानचे बजेट जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नगरविकास मंत्रालयात दाखल करण्यात आले.