शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

५० कोटींची कामे क्षणार्धात मंजुरीने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:51 AM

महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनिटात मंजूर केल्याचे सांगितल्याने विरोधकच हबकले.

ठळक मुद्देमहासभा : विरोधक संतप्तसत्तारूढ सेना-भाजपा बुचकळ्यात; महापौरांंच्या निषेधाच्या घोषणा

नाशिक : महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनिटात मंजूर केल्याचे सांगितल्याने विरोधकच हबकले. त्यांनी विरोध करण्याच्या आतच महासभेचे कामकाज संपुष्टात आणल्याने विरोधकांनी महापौरांचा निषेध असो अशा घोषणा गुरुवारी (दि.२०) महासभेत दिल्या.या प्रकारामुळे महापालिकेतील अर्थकारणाचा वाद पेटला असून, महासभेच्या दरम्यान साध्या विषय पत्रिकांमध्येही स्थायी समितीच्या प्रस्तावांची यादी नाही की प्रस्तावही नाही. या प्रकारामुळे भाजपा आणि सेनेचे नगरसेवक बुचकळ्यात पडले, तर दुसरीकडे कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसे आणि अपक्षांनी महासभेला अंधारात ठेवून घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र देण्यात आले असून, या बेकायदेशीर कामकाजाला विरोधक जबाबदार तर राहणार नाहीच शिवाय आयुक्तांनीदेखील महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी केली आहे.महापालिकेची मासिक महासभा गुरुवारी (दि.२०) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक दहामधील पोटनिवडणूक बिनविरोध निवड झाली असली तरी त्याची अधिकृत घोषणा २४ जून रोजी होणार आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता या प्रभागापुरती असल्याने कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे प्रशासनाने अगोदरच सुचित केले होते. महासभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सध्या प्रभाग दहासाठी निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र सभा घेण्यात येईल. मात्र विषय पत्रिकेवरील विकासकामांचे सर्व विषय मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अखत्यारीत असलेले विकासकामांचे सर्व विषय हे महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३५ नुसार मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावेळी राष्टÑवादीचे गजानन शेलार, शाहू खैरे, गुरुमित बग्गा यांनी हात उंचावून त्यास विरोध केला.महापौर म्हणतात,नगरसेवकांची कामे झाली पाहिजेमहापौर रंजना भानसी यांनी सांगितले की, मला इतर काही माहिती नाही, मात्र नगरसेवकांची कामे झालीच पाहिजे यासाठी सर्व विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. आचारसंहिता आणि अन्य कारणाने सर्व कामे प्रलंबित आहेत. नगरसेवकांची कामे होत नसल्याची ओरड होत आहे त्यामुळे विषय मंजूर केल्याचे सांगतानाच अन्य धोरणात्मक विषयांसाठी २५ जून रोजी सभा घेण्यात येईल. त्यात बेकायदा धार्मिक स्थळे, सेंट्रल किचन, मनपाच्या मिळकती हे विषय हाताळण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.भाजपा-सेनेतही खदखदमहापालिकेचा कारभार मोजकेच चार ते पाच पदाधिकारी हाकत असून, त्यामुळे महासभापूर्व बैठकीत बुधवारी (दि.१९) भाजपाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारी महासभा घेत असताना ज्यादा विषयांची यादी किंवा स्थायी समितीतील प्रलंबित कामांचे प्रस्ताव या महासभेत घेतल्यानंतर त्याची यादीदेखील नगरसेवकांना देण्यात आली नसल्याने भाजपाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासगीत नाराजी व्यक्त करताना महापौरांना असेच कामकाज करायचे होते तर त्यांनी घरीच सभा घ्यायला हवी होती, आम्हाला सभागृहात कशाला बोलवले, असा संताप व्यक्त केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक