नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भूसंपादनाकरिता लागणारे ५० कोटी रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नामंजूर केल्याने अखेर त्यावरील खर्च प्रशासनाला मनपाच्या स्वनिधीतून करावा लागणार असून, त्याचा परिणाम अन्य विकासकामांवर होणार आहे. महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विविध विकासकामे व भूसंपादनाकरिता ४०० कोटी रुपये कर्ज उचलण्याचा निर्णय घेतला आणि त्याला महासभेने व शासनाने मंजुरीही दिली. या ४०० कोटींमध्ये ९० कोटी रुपये हुडकोच्या घरकुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, ५० कोटी रुपये भूसंपादनाकरिता वापरण्यात येणार होते. तर २६० कोटी रुपये सिंहस्थ कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. महापालिकेने पहिल्या टप्प्यात २६० कोटी रुपयांचे कर्ज उचलले असून, त्यातील ५५ कोटी रुपयांची उचल करत ते खर्चही केले आहेत. भूसंपादनासाठी ५० कोटी कर्जाचा प्रस्ताव स्थायीवर ठेवण्यात आला होता. परंतु स्थायीने सदर प्रस्ताव नाकारल्याने आता महापालिकेला सदर ५० कोटी रुपये स्वनिधीतून खर्च करणे भाग पडले आहे. परिणामी, त्याचा अन्य विकासकामांवर परिणाम दिसून येत आहे.
भूसंपादनाचा ५० कोटींचा खर्च मनपाच्या स्वनिधीतून
By admin | Published: August 04, 2015 12:30 AM