सर्व ग्रामपंचायतींचा कारभार केवळ ७० ग्रामसेवक पाहतात. याच ग्रामसेवकांना नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीव्यतिरिक्त इतरही गावांचा कारभार पाहावा लागत आहे. त्यामुळे नेमलेल्या गावासाठी ग्रामसेवक पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. परिणामी एकही काम पूर्ण होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. तहसील कार्यालयात असलेल्या वेगवेगळ्या बैठका, भेटी, ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार एकट्यालाच बघावा लागतो. परिणामी ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. ग्रामसेवकांना वैयक्तिक दाखले व इतर कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. ग्रामपंचायतीची अनेक कामे खोळंबतात. त्याचा कामांवर विपरीत परिणाम होतो. शासन व ग्रामस्थ यातील दुवा म्हणून ग्रामसेवक कार्य करीत असतात; मात्र त्यांना पूर्ण वेळ देता येत नसल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
-कोट....
ग्रामसेवकाअभावी पंचायतीची सर्वच कामे खोळंबतात, त्याच्या मंजुरीशिवाय पुढे कागदपत्रे पूर्ण होत नाहीत, ग्रामसेवकांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी असल्याने ग्रामपंचायात पदाधिकाऱ्यांना त्यांची वाट पहावी लागते. शासनाने त्वरित पूर्णवेळ ग्रामसेवकांची नेमणूक करावी. त्यामुळे विकास कामे वेगात होतील.
- भिका मंडळ, सदस्य, ग्रामपंचायत पाडळदे, ता. मालेगाव