महाराष्टÑ शासन : पदक प्राप्त खेळाडू, मार्गदर्शकांना गौरविण्याचा निर्णयचांदवड : चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील आंतरराष्टÑीय रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास जकार्ता, इंडोनिशेया येथे संपन्न झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत महाराष्टÑ राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्याचा आदेश नुकताच महाराष्टÑ शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णयाने काढला असून सदरचा शासन निर्णय दि. १६ आॅक्टोबर १८ रोजी राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी राज्यपालाच्या आदेशाने प्रसिध्द केला.यामध्ये चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीचा दत्तु भोकनळ यास नौकानयमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याने ५० लाखाचे परितोषिक व त्याच्या मार्गदर्शकाला १२ लाखाचे विशेष पुरस्कार देण्याचे राज्य शासनाने अधिसूचनेत म्हटले आहे. दरम्यान दत्तु भोकनळ याची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यास योग्य वेळी मदत मिळाल्याने तळेगावरोही ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान गेल्या आठवड्यात दत्तु भोकनळने आपल्या गावी जाऊन काळ्या मातीशी इमान राखुन आपला घरचा मका सोंगला होता. त्यास ही परितोषिकांची रक्कम नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल असे त्याच्या नातलगांनी सांगितले.
आंतरराष्टÑीय रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास ्नराज्याकडून ५० लाखाचे बक्षिस जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 5:49 PM
चांदवड : चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील आंतरराष्टÑीय रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास जकार्ता, इंडोनिशेया येथे संपन्न झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत महाराष्टÑ राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्याचा आदेश नुकताच महाराष्टÑ शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णयाने काढला असून सदरचा शासन निर्णय दि. १६ आॅक्टोबर १८ रोजी राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी राज्यपालाच्या आदेशाने प्रसिध्द केला.
ठळक मुद्देमहाराष्टÑ शासन : पदक प्राप्त खेळाडू, मार्गदर्शकांना गौरविण्याचा निर्णय