ठळक मुद्देपरिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४,२२२ झाली आहे
ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या पाच दिवसापासून कमी होताना दिसत असतानाच बुधवारी (दि.५) संख्या वाढली असून ५० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या एकूण ४,२२२ झाली आहे. पैकी १११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ३,८७१ रुग्ण बरे झाले असून, २४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी २४ रुग्णांवर रुग्णालयात आणि २१६ रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.