या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ५० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी हाच जलसाठा जुलैअखेर ४० टक्के इतका होता. यंदा दहा टक्के अधिक जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट तूर्त टळले असले तरी, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काही ठरावीक भागातच हजेरी कायम ठेवून अन्यत्र विश्रांती घेतली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात ६७ टक्के इतका तर पालखेड धरणसमूहात ३२, दारणा धरणात ७६ व गिरणा खोऱ्यात ४० टक्के इतका जलसाठा आहे.
चौकट====
चार धरणांतून विसर्ग
सरासरी धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा असला तरी, काही धरणांमध्ये हीच पातळी ७० ते ८० टक्क्यांच्या आत असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून काहीशा प्रमाणात धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणात ७७ टक्के जलसाठा झाल्याने व समूहात अजूनही पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणातून गेल्या चार दिवसांपासून दोन ते तीन हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्याचबरोबर दारणातून साडेपाच हजार, भावलीतून २०८ व वालदेवीमधून २४१ क्यूसेक पाणी नदीत सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढली आहे.