सिन्नर : येथील संजीवनीनगर भागात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात शहर व उपनगरातील सुमारे ५०० रुग्णांनी लाभ घेतला. २३ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी संबोधित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. निर्मला पवार, दीप्ती वाजे, तेजिस्वनी वाजे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती संगीता पावसे, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, नगरसेवक सोमनाथ पावसे, भगवान कर्पे, रावसाहेब आढाव, उद्योजक निलेश काकड, डॉ. सुजाता लोहारकर, विजय चकोर, डॉ. विलास बोडके आदी उपस्थित होते.
कॅन्सर, नेत्र, उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणीतील २३ रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. नंदू पाटील, डॉ. पायल बिरारी व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. प्रतिमा सोनवणे, मेघा पावसे, अनिता मोरे, ऋचा जाधव, प्रीती लोंढे, शैला एखंडे, रोहिणी काकड, मनीष गुजराथी, अपर्णा क्षत्रिय, शिल्पा गुजराथी, रामहरी वारुंगसे, प्रफुल्ल आव्हाड, बाळासाहेब घुले, मनीषा निकम आदींनी सहकार्य केले.
---------------
सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करताना डॉ. वर्षा लहाडे. समवेत किरण डगळे, सोमनाथ पावसे, डॉ. निर्मला पवार, मेघा पावसे आदी. (१७ सिन्नर १)
===Photopath===
170321\17nsk_13_17032021_13.jpg
===Caption===
१७ सिन्नर १